Ashwini Mahangade : शिवराय नसते तर तुमची आडनावं मुल्ला, खान असती, मराठी अभिनेत्रीने ‘त्या’ लोकांना सुनावलं…

Ashwini Mahangade : मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे Ashwini Mahangade सतत चर्चेत असते. ती एक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक ठिकाणी तिने कामे केली आहेत. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात ती काम करत असते. यामुळे ती सर्वांना परिचित आहे.

सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते यामध्ये काम करते आहे. यामध्ये देखील तिची भूमिका सर्वांना आवडते. यामुळे ती नेहेमी चर्चेत असते. यात तिने अनघाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

अश्विनी सध्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपले मत व्यक्त करत असते. आता एका मुलाखतीत तिने शिवाजी महाराजांवरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

ती म्हणाली ती सतत शिवाजी महाराजांचा उल्लेख करते म्हणून तिला बोललं जातं. मात्र आता शिवाजी महाराज नसते तर तुमचं आडनाव खान, मुल्ला असतं, यामुळे ती आता चर्चेत आहे, यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

अजबगजब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने म्हटले की, काय तुम्ही सारखे शिवाजी महाराज शिवाजी महाराज करत असता. इतक्या वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यावेळी मला त्यांच्याकडे पाहून हसू येते.

आता आपण हे सांगतो ना आम्ही बारा बलुतेदार, अठरापगड जाती हे हे आहोत, हे का सांगता तुम्ही? काय राहिलं असतं आपलं? अशा विरोधी बोलणाऱ्यांचा तेवढा अभ्यास नाही, त्यांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे अशा लोकांसमोर आपली उर्जा कुठे वाया घालवायची.

त्यापेक्षा खेडोपाड्यात महाराजांच्या विचारांचे लोक आहेत मी त्यांच्याशी बोलते, यातून त्यांना किती ऊर्जा मिळेल, असेही तिने म्हटले आहे. नको त्या लोकांना मी महाराजांबद्दल सांगितले तर ते पॉजिटीव्हली घेणार नाही कारण त्यांना त्यांचे विचार बदलायचे नसतात.