विराट-राहुलने गोलंदाजांना फोडले, कुलदीपने फलंदाजी कापून काढली, भारताने पाकड्यांना चारीमुंड्या चीत केले

IND vs PAK: आशिया चषक 2023 मधील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर-4 सामना पावसामुळे राखीव दिवशी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 2 गडी गमावून 356 धावा केल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानचा संघ 8 विकेट गमावून केवळ 128 धावा करू शकला. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 228 धावांनी जिंकला.

पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने केवळ 128 धावा केल्या आणि भारताने 228 धावांनी सामना जिंकला.

डावाची सुरुवात करण्यासाठी इमाम उल हक आणि फखर जमान सलामीवीर म्हणून आले. भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीसमोर दोन्ही खेळाडूंनी कोणतीही जोखीम घेतली नाही आणि पॉवर प्लेमध्ये आपल्या संघाला अतिशय संथ सुरुवात करून दिली.

या महत्त्वाच्या सामन्यात इमाम उल हक कोणतीही जादू दाखवू शकला नाही आणि 18 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तो हार्दिक पांड्याच्या षटकात क्लीन बोल्ड झाला.

24 चेंडूत 10 धावा करून बाबरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 2 धावांपर्यंत मर्यादित राहिला. पाकीस्तानचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सुपर-4मध्ये एक नव्हे तर दोन शतके पाहिली. विराट कोहली आणि केएल राहुलच्या बॅटमधून नाबाद शतकी खेळी पाहायला मिळाली. विराट नाबाद राहिला आणि त्याने 94 चेंडूत 122 धावांची खेळी केली.

विराट कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक होते. तर 6 महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलने शानदार फलंदाजी करत 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. विराट आणि केएल राहुलमध्ये २०० हून अधिक धावांची भागीदारी झाली.

डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान रोहितने ५६ आणि गिलने ४८ धावांचे योगदान दिले.

आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी फलंदाजांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते. साखळी सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाची जबरदस्त फलंदाजी उद्ध्वस्त केली होती.

पण यावेळी भारतीय फलंदाजांनी आपल्या चुकांमधून धडा घेत आपली विकेट गमावली नाही. त्यामुळेच सुपर-4मध्ये पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज विकेट घेण्यासाठी तळमळत दिसले.

टीम इंडियाच्या ज्या 2 विकेट पडल्या होत्या. त्यात शादाब खानने रोहित शर्माच्या रूपाने एक विकेट घेतली. तर गिलची विकेट वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने घेतली आणि इतर ४ गोलंदाजांना विकेटशिवाय समाधान मानावे लागले.

या सामन्यात शाहीन आफ्रिदी सर्वात महागडा ठरला. त्याने 10 षटकात 79 धावा दिल्या आणि त्याला फक्त 1 बळी घेता आला. तर फईम असराफने 74 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. शादाब खानने खराब गोलंदाजी करत ७१ आणि नसीन शाहने ५२ धावा दिल्या.