Babamaharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचे नाव आहे.
महाराष्ट्राच्या गावागावात त्याचे किर्तन ऐकले जात होते, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचे नाव घेतले जात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम त्यांनी केले. यामुळे ते सर्वांना परिचित होते.
बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. ती त्यांनी पुढे ठेवली.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.
नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.