Babar Afridi Fight आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी दिसून आली, आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील नंबर 1 संघाचा प्रवास सुपर 4 मध्ये तळाच्या स्थानासह संपला. या स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला पराभूत करणे अत्यंत महत्त्वाचे होते.
परंतु श्रीलंकेने हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मात्र, पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भांडले. पाकीस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये तुफान राडा झाला. Babar Afridi Fight झाली.
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानसाठी सुपर 4 मधील 2 विजय अत्यंत महत्त्वाचे होते पण पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला. श्रीलंकेविरुद्ध करा किंवा मरोचा सामना गमावल्यानंतर बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भांडले.
पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भिडले. त्यानंतर मोहम्मद रिजवानने दोघांमध्ये येऊन प्रकरण शांत केले, काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
Babar Afridi Fight मध्ये नेमकं काय झालं?
पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये वाद झाला. बाबरने खेळाडूंना सांगितले की ते जबाबदारीने खेळत नाहीत. त्यानंतर शाहीन आफ्रीदी म्हणाला, ‘किमान गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली त्या खेळाडूंचे तरी कौतुक करा’.
शाहीन आफ्रीदीने मध्ये बोललेलं बाबरला आवडलं नाही आणि तो म्हणाला की ‘मला चांगलं माहित आहे की कोण चांगली कामगिरी करत आहे ते. आणि बाबर आफ्रीदीला म्हणाला की तु हे सांगण्याची गरज नाही’. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होता. नंतर रिझवान हा वाद थांबवण्यासाठी मध्ये आला.
आशिया कप 2023 मध्ये साखळी फेरीत नेपाळचा पराभव करून पाकिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरला होता. यानंतर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला.
पण दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 228 धावांनी दणदणीत पराभव केला. श्रीलंकेविरुद्धही पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते.