‘बाळा, आम्ही तुझ्या भेटीला येतोय’, २ वर्षीय मुलीचा मृत्यू जिव्हारी लागल्याने दांपत्याने मंदीरात संपवले जीवन

घशात घास अडकून पोटच्या मुलीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका दांपत्याने एकाच दोरीने गावातील मंदिराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

करण नाना हेगडे (वय २८) व शीतल करण हेगडे (२२) असे मृत दांपत्याचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना एकुलती एक मुलगी होती. ती जेवण करीत असताना तिच्या घशात घास अडकला होता. घशात अन्नाचा घास अडकून श्वास बंद होऊन आई-वडिलांच्या समोरच मुलीचा तडफडून मृत्यू झाला.

यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. ही घटना दोघांच्याही जिव्हारी लागली होती. मुलीचा मृतदेह घेऊन ते गावी आले होते. गावात अंत्यसंस्कार करून तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केले. मात्र त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता.

ते दोघे घरात कोणालाही न सांगता गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील कान्होबा मंदिर परिसरात गेले. तेथील एका झाडाला एक दोरीने गळफास घेऊन दोघांनीही आपले आयुष्य संपवले. यामुळे खळबळ उडाली.

याबाबत घरात दोघेही नसल्याची माहिती झाल्यावर शोधाशोध केल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांच्या खिशात खिशात चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या इच्छेने आत्महत्या करत आहोत. बाळा, आम्ही तुझ्या भेटीला येत आहोत, असे लिहिले आहे.

दरम्यान, चार दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली. या घटनेमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.