बदलापूरमधील शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. याठिकाणी चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.
मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता अक्षय शिंदे याच्या आईवडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली आहे. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे नेमकं खर काय घडलं याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. यामुळे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, आता बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रँच अधिकारी दाखल झाले आहेत. बदलापूरमधील आंदोलनाच्या दिवशी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. या प्रकरणात आता सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.