सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आता उत्तर प्रदेशमधील एका हनुमान मंदिराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, असा दावा व्हिडिओ काढणाऱ्याने केला आहे.
तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या मंदिरात तुफान गर्दी झाली. आस्थेपोटी कित्येक भक्त मंदिरात पोहचले होते. जय श्रीराम, जय हनुमान, बजरंगबली की जय अशा घोषणा ते देत होते. हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू का येत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
कोणाकडून काही चुक झाली आहे का? असा विचारही तेथील स्थानिक नागरिक आणि पुजाऱ्यांच्या डोक्यात येत होता. त्यामुळे त्यांनी हनुमंताची क्षमा मागण्यासही सुरुवात केली होती. ही घटना बांदा जिल्ह्यातील बिहडमधील आहे.
बिहडच्या परीसरामध्ये एक घटदाट जंगल आहे. या जंगलामध्ये हनुमानाचे एक प्राचीन मंदीर आहे. या हनुमानावर स्थानिकांची फार श्रद्धा आहे. त्यामुळे लोक रोज या मंदिराला भेट देत असतात. अशात मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले होते.
याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. भाविकांमध्ये याबाबतची बातमी पसरली होती. त्यामुळे त्यांनी मंदिरात गर्दी केली होती. सुरुवातीला हनुमानाच्या एकाच डोळ्यातून पाणी येत होतं. पण त्यानंतर दुसऱ्या डोळ्यातूनही पाणी यायला लागलं. त्यामुळे नक्की काय होतंय हे भाविकांना कळत नव्हतं.
भाविकांनी तिथे प्रार्थना केली, तसेच कोणाकडून तरी काही चुक झाली असेल म्हणून क्षमाही मागितली. त्यानंतर ते अश्रू थांबणे बंद झाले. कोणतं तरी संकट येत असावं. ते मारुतीरायाने दुर केलं असावं, असा अंदाज पुजारी रामबाबू महाराज यांनी व्यक्त केला आहे.