कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास द्यायचे, बाळासाहेबांना समजलं अन्….; माधवी महाजनी यांनी सांगितली खास आठवण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक अस नाव होतं की त्यांच्या नावावर लोक थरथर कापत असत. त्यांच्या आयुष्यात ते कधी कोणाला घाबरले नाहीत. त्यांनी मराठी माणसाच्या मनावर राज्य केलं. याबाबत माधवी महाजनी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची खास आठवण सांगितली आहे.

याबाबत माहिती अशी की, दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्याचे एक आत्मचरित्र प्रकाशित केले. या आत्मचरित्रात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

या पुस्तकातले अनेक किस्से सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एक किस्सा आहे बाळासाहेब ठाकरे यांचा. झाले असे की, कामाच्या ठिकाणी माधवी महाजनी यांना त्रास दिला जात होता. यामुळे त्या वैतागल्या होत्या. माधवी महाजनी या मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये नोकरीला होत्या.

या ठिकाणी त्यांना सहकाऱ्यांकडून त्रास दिला जायचा. त्या स्टेडिअममधली स्वच्छता, सामानाचा स्टॉक चेक करणं, अशी कामं त्या करत होत्या. त्यांना काही पुरुष त्रास द्यायचे. एकदा माधवी ऑफिसमधून घरी गेल्या असता, त्यांनी रवींद्र यांच्यासोबत ऑफिसमधल्या त्रासाबद्दल त्या बोलत होत्या..

यावेळी घरी एक पत्रकार रवींद्र यांच्या मुलाखतीसाठी आला होता. त्याने हे सगळं बोलणं ऐकलं. आणि परस्पर बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना फोन केला. पत्रकाराने थेट बाळासाहेब ठाकरे यांची वेळ घेतली. हे कळाल्यावर माधवी म्हणाल्या की, इतकीशी गोष्टी बाळासाहेबांना कशाला सांगायच.

असे असताना भेटीची वेळ घेतली असल्याने जावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी माधवी बाळासाहेबांच्या भेटीला गेल्या. बाळासाहेबांनी थेट त्यावेळच्या युनियन लीडर मोरेला मातोश्रीवर बोलावलं. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ऐकून त्याला घाम फुटला होता.

त्याला बाळासाहेबांनी त्याला चांगलाच दम दिला. ‘या कोण आहेत माहित्येय का? त्यांच्या वाटेला कुणी गेलं तर बघाच’, अशा शब्दांत बाळासाहेबांनी त्या युनियन लीडरला सुनावलं होतं, असा हा किस्सा महाजनी यांनी आत्मचरित्र असलेलं चौथा अंक पुस्तक लिहिलं आहे.