वेड्या बहीणीची वेडी ही माया! लहान भावासाठी केलं असं काही की करोडोंचं दानही पडेल फिकं

आईनंतर मुलासाठी कोणी सर्वात जवळंच असेल तर ती म्हणजे बहीण. ती दुसरी आईच असते. बहीण असेल तर ती लहानपणापासून काळजी घेत असते. आपल्या भावावर कोणतं संकट आलं तर ती आधी धावून येते.

आता बहिण भावाच्या नात्याबद्दल सांगणारी एक घटना समोर आली आहे. एका लहान बहिणीने आपल्या भावाला किडनी दान केली आहे. संबंधित भाऊ-बहिण हे पुणे जिल्ह्यातील बारातमीचे आहे.सध्या सगळीकडे त्यांचीच चर्चा होत आहे.

सुभाष गडदरे असे त्या भावाचे नाव आहे, तर वैजयंता वलेकर असे त्या बहिणीचे नाव आहे. दोघेही भाऊ-बहिण हे गडदरवाडी येथे राहतात. सुभाष हे सोमेश्वर कारखान्यात स्वीच ओपरेटर म्हणून काम करतात.

सुभाष यांना काही वर्षांपासून किडनीचा त्रास होत होता. पण २०२१ पासून तो त्रास खुप वाढला. त्यामुळे त्यांचा रक्तदाब २०० पेक्षा जास्त राहू लागला. आयुर्वेदिक उपचारही त्यांच्यावर करण्यात आले पण फरक पडत नव्हता.

आता सुभाष यांना शेवटी डायलिसिस करावे लागले. सुभाष हे घरात एकटेच कर्ते आहेत. त्यामुळे सुभाष यांनी किडनी बदलण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील पाच मावशांच्या किडनी यावेळी तपासण्यात आल्या होत्या. पण कोणतीही योग्य नसल्यामुळे डॉक्टरांनी नकार दिला.

सुभाष यांचे चुलते बापूराव, पत्नी संगीता, बहिण वैजयंता यांच्या किडनीची तपासणी करण्यात आली. आपली किडनी मिळती जुळती असल्याचे वैजयंता यांना कळाले, तेव्हा कुठलाही विचार न करता त्यांनी किडनी बदलून टाकू असा निर्णय घेतला.

वैजयंता यांना पती, मुलं आणि सासू-सासऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून ते अंगावर आजार काढत होते. पण तरीही बहिणीची किडनी कशी घेऊ असा प्रश्न सुभाष यांना पडला होता? पण बहिणीच्या हट्टा पुढे सुभाष यांनीही याला होकार दिला आणि किडनी बदलली.