माझ्यामुळे घरच्यांना त्रास, आता कोणाला त्रास होणार नाही!! भावाचे शेवटचे शब्द अन् घेतला टोकाचा निर्णय…

खुलताबाद याठिकाणी २२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमोल पड्सवान यांनी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भावाला माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला.

आता माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, असा मेसेज केला. अमोल शेखू पड्सवान (22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. त्याचा मेसेज केल्यानंतर त्याचा भाऊ आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान, त्याची मोटारसायकल बोडखाजवळील विहिरीजवळ उभी असलेली दिसली. तसेच त्याच्या चपला व चावी तेथे पडलेले दिसली. यामुळे मोठी खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. नंतर अग्निशमन विभागाला पाचारण करून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचा मृतदेह पाठवण्यात आला. मात्र तेथे आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्याने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले तेथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, सावंगी पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. अमोल पड्सवान यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास भावाला ‘माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला, आता माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही’, असा संदेश पाठवला. यामुळे घरात किंवा बाहेरच्या व्यक्तीकडे हा तपास केला जात आहे.

अमोलचा मेसेज वाचून त्याचा भाऊ व मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. यामुळे ही घटना उघडकीस आली. अमोलच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, बहिन असा परिवार आहे. या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.