---Advertisement---

Beed news : आई शेतात काम करत असताना ३ भावंडानी जीव सोडला, बीडमध्ये भावंडांच्या मृत्यूने उडाली खळबळ…

---Advertisement---

Beed news : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी केज तालुक्यात पैठण सावळेश्वर येथे शेतातील पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटूंबाने एकच हंबरडा फोडला आहे. या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

याबाबत माहिती अशी की, सावळेश्वर येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी तीनही बालकांच्या आई गेल्या होत्या. या तीनही बालकांना तेथून जवळच असलेल्या झाडाखाली थांबवून सर्वजण ज्वारी काढण्यात मग्न झाले. यावेळी ही घटना घडली आहे.

याठिकाणी खेळत असताना जवळच एक हौद होता. त्यात ५ फूट पाणी होते. खेळता खेळता एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बाकीचे दोघेही पाण्यात उतरले. मात्र तिघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पैठण गावावर शोककळा पसरली आहे. (९ वर्ष), पार्थ श्रीराम चौधरी (७ वर्ष), कानिफनाथ गणेश चौधरी (७ वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला आहे.

दरम्यान, मृत पावलेले तिघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. पैकी एका मुलाला एक भाऊ आहे, तर दोघांना बहिणी आहेत. एकाच परिवारातील तीन चिमुकल्यांच्या अकाली निधनाने कुटूंबाला धक्का बसला आहे.

घटनेनंतर याठिकाणी चिमुकल्यांचे निष्प्राण देह पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. ही घटना वाऱ्यासारखी गावासह केज तालुक्यात पसरली. त्यानंतर आसपासच्या गावांतील रहिवासी घटनास्थळी दाखल झाले होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---