Beed news : बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाळूजमध्ये जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. याठिकाणी विवस्त्र महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, स्थानिक राजकारण्याच्या कुटुंबियांनी महिलेच्या कुटुंबाच्या जमिनीवर दावा सांगितल्याने निर्माण झालेल्या वादातून महिलेचे कपडे फाटले. याबाबत पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.
याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मात्र राज्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
महिलेने काही प्रश्न केल्यामुळे तिला मारहाण केली गेली तसेच शिवीगाळ करून कपडे देखील फाडल्याचे काहींनी सांगितले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळत पोलीस याठिकाणी दाखल झाले होते.
घटनेचा तपास केला असता धक्कादायक खुलासे केले जात आहेत. यामुळे याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे पोलीस तपास सुरू आहे.