नागपुरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संजय राऊत यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले, आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांना श्रावण-गणपतीत गोमांस चालतं का? नागपुरात रस्ते सुरक्षेचा नाही तर बेवडेबाजीचा नियम आहे. अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता, तर त्याचं काय झालं असतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच ते म्हणाले, पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, मित्राला धरुन त्याची धिंड काढली असती. इथे सलमान खान सुटतो, बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. तो कोणाचाही मुलगा असो, नियम सर्वांना सारखे आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री राज्याला कधी मिळाला नाही, अशी देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.
तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणी FIR मध्ये संकेत बावनकुळे यांच नाव कसकाय नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी देखील याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.