आपल्याकडे पावसळ्यात सर्पदंशाच्या अनेक घटना पाहायला मिळतात. यामध्ये अनेकांचे जीव देखील जातात. हा आकडा वाढतच आहे. ग्रामीण भागात या घटना जास्त आहेत. सर्पदंशावर वेळेवर उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात शेतीची कामं वाढलेली असतात आणि याच काळात साप अंडी घालतात तसंच घोणससारखे साप पिल्लांना जन्म देतात. यामुळे या काळात साप जास्त चावतात. चार साप माणसाचा जीव घेऊ शकण्याइतके विषारी असतात. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक असते.
घोणस, मण्यार, फुरसे, नाग या चार जाती खूपच विषारी असतात. यामुळे तुमच्या जीवाला धोका असतो. आपण सापांना घाबरायला नको कारण ते आपल्याला घाबरतात. इतकंच नाही तर आपण काळजी घेतली आणि सापांच्या सवयी लक्षात घेतल्या तर सर्पदंशाचा धोकाही कमी होतो.
यातील काही साप चावण्याआधी इशारा देतात. नाग फणा काढतो, फुरसं फुत्कार टाकते आणि घोणस आपल्या शरीरावरचे खवले घासतं ज्यातून एक आवाज निघतो. तुम्हाला जर सापांची वर्तणूक माहीत असेल तर हे इशारे पाहून तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता. फक्त याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
यामध्ये साधा मण्यार जातीचा साप सोडला तर इतर साप चावण्याआधी इशारा देतात. नाग चावल्यानंतर 15 ते 20 मिनिटात शरीरावर विषाचे परिणाम दिसतात. त्यानंतर विषाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोचते. जर मण्यार चावला तर विषाची लक्षणं दिसायला साधारण दोन ते अडीच तास लागतात.
नंतर चार ते सहा तासांत विषाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोचते. फुरसं आणि घोणस चावल्यानंतर त्याची लक्षणं लगेच दिसत नाहीत. नंतर वेदना होयला सुरुवात होते. साप चावल्यावर जिथे साप चावला तो भाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. त्या भागातलं रक्ताभिसरण थांबवण्यासाठी बोटभर पट्टी बांधा.
तसेच लगेच एमडी डॉक्टरकडे किंवा सरकारी दवाखान्यात जा. जे लोक सापांची संख्या जास्त असलेल्या भागात राहातात त्यांनी साप चावू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक घराबाहेर अंगणात झोपतात त्यांनी मच्छरदाणी लावून झोपले पाहिजे.
पावसाळ्यात सापांचे अन्न असणारे बेडूक, उंदीर, पाली, किडे भरपूर प्रमाणत उपलब्ध असल्याने ते भक्ष्याच्या शोधात सतत इकडून तिकडे फिरता असतात. लोकांच्या घराच्या आसपासही दिसतात. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.