पत्नी आणि पुतण्याची हत्या केलेल्या ACP गायकवाड कुटूंबात नक्की काय घडलं? मुलाने सांगीतला भयानक घटनाक्रम

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं.

भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार होते. पण सोमवारी पहाटेच्या सुमारास अशी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

१५ जुलैला ते कामावरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी पत्नी मोनीला गोळी मारली, गोळीचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या दरवाजा उघडून रुममध्ये आला तर त्यालाही त्यांनी गोळी मारली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारली.

दीपक गायकवाड असे त्या पुतण्याचे नाव होते. तो धायरीला राहत होता, तर भारत गायकवाड यांचे कुटुंब हे बाणेरला राहत होते. भारत गायकवाड जेव्हा पण कधी बाणेरला यायचे तेव्हा तो त्यांच्यासाठी मटण घेऊन यायचा.

२३ जुलैलाही तो आपल्या काकांसाठी मटण घेऊन आला होता. पाऊस थांबल्यावर तो घरी जाणार होता. पण पाऊस थांबत नसल्यामुळे तो घरी गेला नाही आणि रात्री तिथेच थांबला. पहाटेच्या वेळी काकांच्या रुममधून गोळीचा आवाज आल्यानंतर तो रुममध्ये गेला तर भारत गायकवाड यांनी त्यालाही गोळी मारली.

झाले असे की, रविवारी रात्री १० वाजता जेवण करुन सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर पहाटेच्यावेळी त्यांच्या खोलीतून गोळी मारल्याचा आवाज आला. त्यानंतर दीपकने दरवाजा उघडला तर गायकवाड यांनी त्यालाही गोळी मारली.

त्यावेळी गायकवाड यांचा मुलगा सुहासही तिथेच होता. तोही रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. पण गायकवाड त्याला म्हणाले की तु इथून जा नाही, तर तुलाही गोळी मारेल. त्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वत:लाही गोळी मारुन घेतली. असे घटनाक्रम त्यांच्या मुलाने सांगितला आहे.