मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरण आणि पैशांच्या लोभामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ती हत्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे खरे गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती लागले आहे. ऋचा जैन असे त्या महिलेचे नाव आहे. तिने प्रियकर दीपेश भार्गव या तरुणासोबत सोबत मिळून तिचा पती सौरभ जैन यांची हत्या केली होती.
शमशाबादमध्ये ही घटना घडली आहे. त्या दोघांनी मिळून सौरभची हत्या केली होती. त्यानंतर एका निर्जनस्थळी त्याचा मृतदेह फेकून दिला होता. अखेर पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर हे सर्व उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांनी आपणच हत्या केल्याची कबूली दिली आहे. जवळपास सहा महिन्यानंतर या हत्येचा उलगडा झाला आहे.
सौरभ जैनची हत्या झाल्यानंतर कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झालं होतं. ऋचाचे दीपकसोबत प्रेम संबंध होते. ऋचा कित्येकदा सौरभचे घर सोडून पळाली होती. त्याच्यासोबत काही महिने राहिल्यानंतर ती पुन्हा पतीकडे आली होती. सौरभनेही पत्नीचे प्रेमसंबंध स्वीकारले होते.
फेब्रुवारीमध्ये सौरभचा अपघात झाला होता. त्यावेळी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. उपचारानंतर सौरभ दुसऱ्या कारने भोपाळला गेला होता. त्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याची हत्या केली.
सौरभची ओळख पटणार नाही अशी त्याची अवस्था त्यांनी केली होती. त्यानंतर ती दीपेशसोबत राहू लागली. जानेवारीमध्ये सौरभने त्याच्या नावाची जमीन विकली होती. त्यातून त्याला १२ लाख रुपये मिळाले होते. त्यातील साडे नऊ लाख त्याने बँकेच्या खात्यात जमा केले होते.
त्या पैशांसाठीच ऋचा आणि दीपेशने हत्येचा कट रचला. दीपेशच्या हत्येनंतर ऋचाने हळुहळु करुन सौरभच्या खात्यातील सारे पैसे काढून घेतले. अशात सहा महिन्यानंतर सौरभच्या कुटुंबाला संशय आला आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सुरुवातीला तर त्यांनी दिशाभूल केली. पण सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर अखेर त्यांनी हत्येची कबुली दिली.