मोठी बातमी! गौतमी पाटीलवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलवर सध्या दुःखाचा डोंगर आला आहे. गौतमीचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यावर धनकवडी येथील स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

गौतमी पाटील हे नाव सतत चर्चेत असते. तिचे लाखो चाहते राज्यभर आहेत. तिची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. असे असताना तीन दिवसांपूर्वी गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. यामुळे एकच चर्चा सुरू होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. धुळे शहरात ते सापडले.

स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना याबाबत मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचे आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचे समोर आले होते.

दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे काही नातेवाईक हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत खालावत गेली होती.

दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच गौतमी पाटीलची काकू आणि तिची चुलत बहीण हे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले होते. मात्र पुण्यात देखील उपचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

दरम्यान, TB मुळे दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. याबाबत माहिती मिळताच गौतमीने पुढील उपचारांसाठी वडिलांना पुण्यात आणले होते. वडिलांनी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन, असे तिने म्हटले होते.