मोठी बातमी! दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…

पंजाबमध्ये अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मलेरकोटलामध्ये रात्री भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनरांच्यामध्ये एका कार सापडल्याने कारमधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

यामुळे एकच पळापळ उडाली होती. हे सर्वजण एकाच गावातील असल्याचे सांगितले जात आहे. मलेरकोटला येथूवन बाबा हदर शेख दर्ग्य़ाहून ते घरी परतत होते. यावेळी ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

संगरुरपासून १५ किमी अंतरावरील मेहला चौक भागात हा अपघात  झाला आहे. याठिकाणी दोन मोठे कंटेनर वाहतूक करणारे ट्रक एकमेकांवर आदळले. यामध्ये ही कार सापडली. या कारचा अक्षरशः यामध्ये भुगा झाला आहे.

या अपघातात एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण सहा जणांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. रात्री २ वाजता हा अपघात झाला. हे सर्व सुनामला जात होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे.

दरम्यान, अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने पोलिसांनी वेल्डिंग करण्याच्या मशीनने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. यानंतर हे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येईल.

मृतांमध्ये दीपक जिंदल, नीरज सिंगला आणि त्यांचा मुलगा, लक्की कुमार, विजय कुमार व दवेश जिंदल यांचा समावेश आहे. याबाबत पोलीस तपास करत असून कंटेनरचालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.