मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
राजाभाऊ भिलारे हे शिंदे गटात सामील होणारे पुण्यातील शिवसेनेतील पहिले पदाधिकारी होते. यामुळे त्यांनी असा निर्णय का घेतला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासोबत मोठी फळी देखील होती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर भिलारे यांनी सर्वात अगोदर शिंदे यांना समर्थन दिले होते. भिलारे यांच्याकडे एकनाथ शिंदे हे चालवत असलेल्या वैद्यकीय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपद होते.
पक्ष सोडताना ते म्हणाले, कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही. त्यांच्याकडे अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी त्यांच्यावर होती.
त्यामुळे पुण्यात शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम करणारे अनेज शिलेदार सध्या एकनाथ शिंदे यांना सोडून जात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे देखील सरकारमध्ये दाखल झाल्याने सध्या अनेकांची अडचण देखील पुण्यात झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.