बारामती तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील सोमेश्वरमध्ये शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून बारामतीतील (Baramati Crime News) निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये उपचारात एकाच मृत्यू झाला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. ठरलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून गोळीबाराची घटना घडली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात शर्यतीच्या बैलाचा व्यवहार झाला होता.
दरम्यान, वर्ष उलटून गेलं तरीदेखील व्यवहार पूर्ण झाला नाही. यामुळे बैल परत आणण्यासाठी निंबाळकर गेले होते. त्यावेळी वाद झाला आणि याच वादातून त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारात रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसार म्हणून पाच लाख रुपये दिले होते.
उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आता या प्रकरणामुळे बैलगाडाप्रेमी आक्रमक झाले असून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.