राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. असे असताना महाविकास आघाडीचा मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्या ठिकाणी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आता समोर आलं आहे.
यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचे देखील आता स्पष्ट झालं आहे. यामुळे आता इच्छुक कामाला लागले आहेत.
दरम्यान, 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीच्या जागेवर अजूनही कोणता निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार आहे.
राज्यात 48 जागांपैकी काँग्रेसला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड लातूर, सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या दोन जागा पाहिजे आहेत. यामुळे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या जागा देखील निश्चित आहेत, यामध्ये थोडाफार बदल होईल.
तसेच राष्ट्रवादीला भंडारा – गोंदिया, बीड, शिरूर, बारामती, सातारा, माढा, कोल्हापूर, रावेर, अहमदनगर, दिंडोरी, रायगड, कल्याण आणि मुंबईतल्या काही जागा मिळाल्या आहेत. सेनेला शिवसेनेला आताच्या 18 जागांसोबत मुंबईत एक जागा जास्त दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई. ईशान्य मुंबई या जागा पाहिजे आहेत.
यामुळे यावर अंतिम निर्णय लवकरच होणार असून अनेक जागांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत आता मित्र पक्षांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.