मोठी बातमी! राज ठाकरे यांनी विधानसभेचे उमेदवार केले जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली उमेदवारी….

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून आता मनसेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी राज ठाकरे यांनी दौरे सुरू केले आहेत. आज सोलापूरमध्ये राज ठाकरे हे बैठका घेणार आहेत.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मनसेने मोठी आघाडी घेतली आहे.

निवडणुकांना किमान दोन ते तीन महिन्यांचा वेळ आहे. अजून निवडणुकांचे बिगुल वाजण्यास अवकाश आहे. मात्र त्याआधीच मनसेने दोन शिलेदार जाहीर करत आघाडी घेतली आहे. यामुळे किती जागा ते जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे.

सध्या शिवडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे आहे. अजय चौधरी येथून आमदार आहेत. त्यामुळे शिवडीतून तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसे भाजप सोबत युती करेल असे सांगितले जात होते. मात्र आता एकला चलो रे ची भूमिका मनसेने घेतली आहे.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उमेदवार देत राज ठाकरेंनी स्वबळाचा आवाज घट्ट केला आहे. कार्यकर्त्यांना यावेळी कामाला लागण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले.

त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांत तिहेरी लढती होण्याचे संकेत मिळत आहेत. 200 ते 225 जागा लढवण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यासाठी तयारी करण्यासाठी ते महाराष्ट्रात दौरे करत असून अमित ठाकरे देखील दौरे करत आहेत.