मोठी बातमी! पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, 11 अधिकाऱ्यांचा मृत्यू, घटनेने उडाली खळबळ….

दरोडेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानमधून समोर आली आहे. मध्यरात्री हल्ला झाला असून. या हल्ल्यात 11 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत.

तसेच या हल्ल्यानंतर अनेक पोलीस अधिकारी गायब झाले आहेत. त्यांचा अजून शोध लागलेला नाही. हा हल्ला झाला तेव्हा हे सर्व पोलीस अधिकारी एका बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र अचानक हा हल्ला झाल्याने काही समजायच्या आतच सगळं घडून गेलं. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

या हल्ल्यानंतर सगळीकडे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा हल्ला पाकिस्तानच्या रहीम यार खान परिसरात झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पोलिसांच्या ताफ्यातील एक गाडी खराब झाली होती, तीच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला.

पोलिसांना बचावाची संधी देखील मिळाली नाही. दरोडेखोरांकडून पोलिसांवर रॉकेट लॉंचरने हल्ला करण्यात आला. त्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार देखील केला. यामुळे पोलीस बेसावध असतानाच हा हल्ला घडला आहे. सध्या बेपत्ता असलेल्या पोलिसांचा शोध घेतला जात आहे.

हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यामध्ये आकरा पोलीस अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अद्याप चार पोलीस अधिकरी बेपत्ता आहे. याबाबत सरकारने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हल्ला झाला तेव्हा पोलिसांच्या दोन वाहनांमध्ये वीस पेक्षा अधिक पोलीस होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.