पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, डॉ. हळनोरचा मोठा दावा, रक्त कस बदललं, कोणाचा दबाव, सगळं उघड केलं…

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेने रक्त बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आहे. यामुळे मोठे खुलासे बाहेर येत आहेत.

पोलिसांनी ससून रुग्णालयातील सर्व ‘सीसीटीव्ही’चे फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्या फुटेजमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. असे असताना डॉ. अजय तावरे आणि विशाल अगरवालचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी तावरे यांनी दबाव टाकला.

रक्त नमुना बदलला, पण माझ्या मनाला ते पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते. त्यामुळे मी दोन दिवस झोपू शकलो नाही, असा खुलासा डॉ. श्रीहरी हाळनोर याने चौकशीत केला आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पोलीस सध्या त्यांची चौकशी करत आहेत.

दरम्यान, विशाल अगरवाल आणि डॉ. तावरे यांचा घटनेच्या दिवशी दोन तासांच्या काळात १४ वेळा संपर्क झाल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळेमार्फत अगरवाल आणि तावरेचा संवाद झाला होता. यामुळे यातून त्यांनी सगळं ठरवले असल्याचे सांगितले जात आहे.

घटकांबळे याला देखील कारमधून ससून रुग्णालयात आलेली एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने संपूर्ण विषय घटकांबळेला सांगितला. त्या वेळी घटकांबळेने डॉ. तावरेचे नाव सांगून मोबइल क्रमांक दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर विशाल व डॉ. तावरेचा संपर्क झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच पोलीस आता अपघात प्रकरणातील अल्पवयीन कार चालकाच्या रक्ताचा नमुना ससून रुग्णालयात देण्यापूर्वी डॉ. अजय तावरेसोबत सल्लामसलत करणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष रक्ताचा नमुना देताना उपस्थित असलेल्या तीन व्यक्तींचा शोध घेत आहेत.