राज्यात सध्या राष्ट्रवादीत फूट पडली आहे. यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. यामुळे आता जागांचे समिकरण बदलले आहे. सध्या सोशल मीडियावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची एक बातमी व्हायरल होत आहे.
ही बातमी म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माध्यमातून तशा बातम्या देखील समोर येत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने लोकसभेच्या जागांसाठी राज्यभर चाचपणी सुरू केली आहे. त्यात शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाने दावा केला असून त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार गटाकडून होऊ लागली आहे. यामुळे आता ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे लवकरच समजेल.
असे असले तरी आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर आढळराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, शिंदे गटाकडून या जागेबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
असे असताना मात्र अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अजित पवार गट राज्यात लोकसभेच्या 9 जागा देखील लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता प्रत्यक्षात किती जागा मिळणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, आपण याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या बातमीने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. आता लवकरच याबाबत सविस्तर माहिती समोर येईल.