Bishan Singh Bedi : मृत्यूनंतर ‘इतक्या’ करोडची संपत्ती मागे सोडून गेले क्रिकेटर बिशनसिंग बेदी; आलिशान फार्म हाऊससह घरे अन्..

Bishan Singh Bedi : काल क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन झाले. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे.

त्यांनी भारतासाठी एकूण ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यांनी २७३ विकेट्स घेतल्या होत्या. बेदी हे भारतातील एक सर्वोत्तम लेफ्ट आर्म स्पिनर होते. यामुळे ते अनेकांना घाम फोडत होते.

सध्या बेदी यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये त्यांची संपत्ती ५ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच ४१ कोटी इतकी होते. या शिवाय वेगवेगळ्या शहरात त्यांची अनेक आलिशान फार्म हाऊस आणि घरे आहेत.

बिशनसिंह बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी अमृतसरमध्ये झाला होता. १९६६ ते १९७९ पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी २२ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.

बिशन सिंह बेदी १९७० च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी २२ टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली होती. त्यांनी भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जायची. त्यांनी टीम इंडियासाठी ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी २७३ बळी घेतले होते. यामुळे एक मोठे खेळाडू म्हणून त्यांची जगात ओळख होती.

त्यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. १९६८ मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. त्यानंतर ते अनेक वर्षे दिल्ली रणजी संघाचा भाग होते. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. यामुळे बड्या खेळाडूंनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.