नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सना खान असे त्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने हत्याची कबूली सुद्धा दिली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
सना १ ऑगस्टला मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. ती तिचा मित्र पप्पू साहूला भेटायला गेली होती. अमित साहू व्यवसायिक पार्टनर असल्यामुळे ती मुक्कामाला त्याच्या घरी थांबली होती. त्याच रात्री हे सगळं घडलं होतं.
२ ऑगस्टला सनाचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंब चिंतेत होते. त्यांनी नागपूर पोलिसांकडे याबाबत तक्रारही केली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक सना खानचा शोध घेण्यासाठी जबलपूरला गेले होते. अमित साहूच्या घरी राहणार होती. त्यामुळे ते थेट त्याच्याच घरी गेले.
पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्या नोकराने सुद्धा तिथून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला शोधून त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले.
अमित साहूच्या घरी जी गाडी होती त्याच्यावर रक्त होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. याचकारणामुळे पोलिस त्याची कसून चौकशी करत होते. पोलिसांच्या चौकशीमुळे जितेंद्र खुप घाबरला होता. अखेर त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.