बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी येत आहे. अभिनेता अपूर्व शुक्ला यांचे निधन झाले आहे. असे सांगितले जात आहे की, बुधवार, 20 डिसेंबर रोजी भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये अभिनेत्याचा मृत्यू झाला.
रिपोर्ट्सनुसार, अपूर्व शुक्ला डिप्रेशनने त्रस्त होता आणि कॅम्पसमध्ये असलेल्या नाईट शेल्टरमध्ये राहत होता. ‘न्यूज18’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, त्यांना 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या निवारागृहात राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांना मृत अपूर्व शुक्लाच्या खिशातून एक स्लिप सापडली, ज्यावर एक फोन नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवर कॉल केल्यावर ती अपूर्व शुक्लाची मावशी असल्याचे आणि मृताचे नाव अपूर्व शुक्ला असल्याचे उघड झाले.
दिवंगत अभिनेत्याच्या मावशीने सांगितले की, अपूर्व शुक्ला हे बर्याच काळापासून नैराश्याने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांनी पुढे सांगितले की अपूर्व शुक्ला हे थिएटर आर्टिस्ट आणि पत्रकार देखील होते. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. वडिलांच्या निधनानंतर अपूर्व शुक्ला डिप्रेशनमध्ये गेल्याचे अभिनेत्याच्या काकूंनी सांगितले.
तिने अपूर्व शुक्लाला कटनीमध्ये आपल्यासोबत राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. अपूर्व शुक्लाचे वडीलही पत्रकार होते, तर आई वकील होती. तो आधी जहांगीराबाद येथे आई-वडिलांसोबत राहत होता.
सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्याने अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईची सावली डोक्यावरून उठल्यानंतर अपूर्व शुक्ला शॉकमध्ये जगू लागला.
यातूनही तो सावरू शकला नाही तोच आई गमावल्यानंतर अवघ्या वर्षभरातच वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर अपूर्व शुक्ला डिप्रेशनमध्ये गेला. सर्वांशी संपर्क तोडला आणि नाईट शेल्टरमध्ये राहू लागला.
अपूर्व शुक्लाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने चित्रपटांसोबतच काही टीव्ही शोमध्ये काम केले होते. अपूर्व शुक्लाने अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या चित्रपटात काम केले होते.
‘चक्रव्यूह’, ‘सत्याग्रह’, ‘गंगाजल’ आणि ‘तबला’ यासारख्या काही चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच तो झीटीव्ही आणि सोनीच्या काही मालिकांमध्ये दिसला होता.