पतीसोबत घटस्फोट, नंतर दिराच्याच प्रेमात पडली तरूणी; नंतर घडलं असं की टाॅवरवर चढून दोघांनी…

काही दिवसांपूर्वी एक विचित्र बातमी समोर आली होती. प्रियकराशी वाद झाल्यामुळे एका प्रेयसी थेट टॉवर चढली होती. त्यानंतर तिला समजवण्यासाठी तो तरुणही टॉवरवर चढला होता. छत्तीसगडमध्ये ही घटना घडली होती.

दोघेही असे टॉवरवर चढल्यामुळे ते चर्चेत आले होते. आता त्यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. त्या तरुणीची आणि तरुणाची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. त्या तरुणीचे नाव अनिता असे आहे. ती नेवरी या गावात राहते.

अनिताचे लग्न ६ वर्षांपूर्वी झाले होते. तिला एक ४ वर्षांचा मुलगाही आहे. पण तिचे पतीसोबत खुप वाद होत होते. त्यामुळे ती मुलाला पतीकडेच सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. तिथे गेल्यावर ती एका दुकानामध्ये काम करत होती.

दुकानात काम करत असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली होती. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यामुळे दोघांना लग्न करायचे होते. अशातच एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे अनिताला धक्काच बसला.

तो तरुण आणि अनितामध्ये दिर-वहिणीचं नातं होतं. अनिताचा प्रियकर हा तिच्या पतीचा आतेभाऊ होता. हे सगळं कळल्यानंतर ती जीवन संपवण्यासाठी टॉवरवर चढली होती. पण तरुणाने टॉवरवर चढून तिला वाचवलं आहे.

गावकऱ्यांना हे कळलं असतं तर त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला असता. पण तिला त्या तरुणापासून वेगळं होण्याची इच्छा नव्हती. सत्य समोर आल्यानंतर गावकरी आणि कुटुंब आमचे लग्न होऊ देणार नाही. याची भिती असल्यामुळे मी असे केले, असे अनिताने म्हटले आहे.