हरीश्चंद्र गडावर फिरायला गेलेल्या तरुणांसोबत घडली भयानक घटना; एकाचा जागीच मृत्यू

सध्या पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला जात आहे. पण ट्रेकिंगला जाताना धक्कादायक घटनाही घडत आहे. हरिशचंद्र गडावर जाण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. पण आता तिथूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील हरिशचंद्र गडावर फिरण्यासाठी गेलेल्या सहा सहा तरुणांसोबत भयानक घटना घडली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तिथे थंडी जास्त असल्यामुळे एकाचा गारठून गेला होता. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

धुक्यामुळे सहाजण रस्ता भटकले होते. त्यामुळे त्यांनी एका कपारीत मुक्काम केला होता. पण यावेळी थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. थंडी पावसामुळे त्याची प्रकृती खालावली होती. तेथील थंडी सहन होऊ शकली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

अनिल गिते, अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम तिपाले, महादु भुतेकर, हरिओम बोरुडे हे सहा जण हरिशचंद्रगडावर फिरण्यासाठी गेले होते. ते १ ऑगस्टला या गडावर आले होते. संध्याकाळी ५ वाजता त्यांनी तोलार खिंडीतून चढण्यास सुरुवात केली. पण धुक्यामुळे ते रस्ता भटकले.

पाऊस जोऱ्यात येऊ लागल्यामुळे त्यांनी डोंगराच्या कपारीत थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे पाऊस जोरात सुरु होता, तसेच थंडीही प्रचंड पडली होती. त्यामुळे अनिल गिते याची प्रकृती खालावली. थंडीने तो एकदम गारठून गेला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

वनविभागाला आणि स्थानिक नागररिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने तिथे धाव घेतली. वनविभागाने त्यांना रेस्क्यू केले आहे. बाकीच्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीन जणांवर उपचार सुरु आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.