गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या अनेक धक्कदायक घटना समोर येत आहे. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून समोर आली आहे. एका भाच्याने आपल्याच मामीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी न्यायालयाने दोन तरुणांना २०-२० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याप्रकरणी २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. कोतवाली शहरात ही घटना घडली होती.
२० डिसेंबर २०१९ रोजी महिलेने पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, पीडिता गावातील शेतात काम करत होती. त्यावेळी अमर राजपूत आणि भगवानदास हे तिथे आले. त्यानंतर दोघांनीही तिला बंदुकीचा धाक दाखवत फरफटत एका झोपडीजवळ नेले. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अत्याचार केले.
तसेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील त्यांनी काढून घेतले. धक्कादायक म्हणजे आरोपी तिचा भाचाच होता. त्याआधीच मार्च महिन्यातही त्याने तिच्यावर अत्याचार केले होते. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केले होते.
आरोपीने त्या अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कोणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी तो देत होता. वारंवार होणाऱ्या अत्याचारांमुळे संतापलेली महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर चार वर्षानंतर तिला न्याय मिळाला आहे.
याप्रकरणी ६५ हून अधिक सुनावण्या झाल्या होत्या. तर ४ न्यायधीश बदलले होते. अखेर ७ साक्षीदारांनी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना २०-२० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड दिला आहे.