ब्रेकिंग! भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र, धक्कादायक माहिती आली समोर…

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानंत तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये फायनलला धडक मारली होती. विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुजमान लोपेलचा पराभव केला होता. सुवर्णपदकापासून आता ती फक्त एक डाव दूर होती. मात्र त्या आधीच ही बातमी समोर आल्याने निराशा झाली आहे. ५० किलो वजनी गटात विनेशचा अंतिम सामना आज रात्री दहा वाजता होणार होता.

ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती. मात्र आता वजन जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामुळे आता चाहत्यांना मोठी निराशाजनक बातमी ही आली आहे. ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती.

असे असताना मात्र आता वजन जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. यामध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविण्यात आलं आहे.

काल रात्रीपासून सर्व प्रयत्न करूनही आज सकाळी तिचं वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त भरले आहे. तूर्त भारतीय चमूकडून दुसरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता उर्वरित स्पर्धेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे भारतीय चमूकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विनेशचे वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त भरले आहे. आता नियमानुसार फोगाट रौप्य पदकासाठीही पात्र होणार ठरणार नाही. या गटातील स्पर्धेत फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते घोषित केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.