गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरल्याची माहिती मिळत आहे. यामुळे चर्चा सुरू आहे.
अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रम कायम असतानाच शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज दाखल केला आहे. यामुळे तेच अधिकृत उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही. याठिकाणी अनेकजण इच्छुक आहेत.
आता शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. याठिकाणी छगन भुजबळ, तसेच हेमंत गोडसे हे देखील प्रचारात अग्रेसर आहेत. यामुळे आता नेमकं कोणता उमेदवार फायनल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता हे सगळे मागे पडून नवीनच नाव पुढे आल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.