राज्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच कालपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विक्रमी अशी पावसाची नोंद पुणे जिल्ह्यात झाली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुण्यात नद्यांना पूर आला आहे.
नदी-नाले तुडुंब भरले आहेत. असे असताना लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लवासामध्ये दरड दोन व्हिलांवर कोसळली आहे. व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहत असल्यांची माहिती मिळत आहे. चार लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी यासंदर्भातील माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यामध्ये काल सकाळपासून पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरापासून जवळच असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. या ठिकाणी अनेकजण फिरायला येत असतात. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. याठिकाणी मोठा पाऊस पडला आहे.
काही लोक बेपत्ता आहे. अद्याप बचावपथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक लोक मदतीचे काम करत आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे ही मोठी दुर्घटना लवासामध्ये घडली आहे. तेथील परिस्थिती सध्या अतिशय दैनिय आहे. यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.
सध्या तरी कोणतही बचावकार्य तिथे पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून यामुळे अनेक पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पुणे पिंपरी चिंचवड मधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ऑफिसला देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.