---Advertisement---

शेजाऱ्याच्या घरात घुसला, ओढणीने पाय बांधले अन्…; घटनेने राज्यात खळबळ

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. या घटनेने सगळेच हादरले असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आरोपी रात्री ११ च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात ३८ वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. आरोपीने पीडितेचे ओढणीने हात-पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने बलात्कार केला आहे.

या महिनेने याला प्रतिकार केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आरोपीने तिच्यावर हल्लाही केल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी अटक केले आहे.

याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाण्यामधून बलात्काराची घटना समोर आली होती. यामुळे याठिकाणी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

28 वर्षीय आरोपीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत अनेकवेळा बलात्कार केला होता. अल्पवयीन मुलीले शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिला त्यानंतर आरोपी मुलाने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता देखील ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---