Buldana news : बुलढाणा जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी कार विहिरीत कोसळल्याने मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेत पती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, पत्नीला कार शिकवताना विहिरीत कार पडली. यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. नंतर पतीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
धक्कादायक माहिती म्हणजे, विहिरीत पडलेल्या मायलेकीच्या रेस्क्यू दरम्यान एका युवकाने विहिरीत उडी टाकली. हा युवक बाहेर आलाच नाही. पवन पिपळे असे त्याचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. ही धक्कादायक घटना देऊळगाव राजा येथे घडली.
दरम्यान, रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वातीला कार शिकवत होते. त्यांची मुलगी देखील सोबत होती. कार शिकवत असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ विहिरीमध्ये पडली. यामुळे ही घटना घडली.
घटनेनंतर अमोल मुरकुट कसेबसे बाहेर आले. मात्र, स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी याठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू आहे.