बुलढाण्यात भीषण अपघात, तिन्ही भावांचा जागीच मृत्यू; दुचाकीवर जात होते ट्रिपल सीट अन्…

रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामध्ये अनेकजण आपला जीव गमावत आहे. असाच एक भीषण अपघात बुलढाण्यामध्ये झाला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदुरा-मोताळा याठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरुन ट्रिपल सीट जात असताना त्यांनी ट्रकला धडक दिली होती. त्यामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

या अपघातात दुचाकीवर असलेले तिघे भाऊ होते. त्यामध्ये दोन सख्खे भाऊ होते तर एक चुलत भाऊ होता. उमेश कांडारकर, प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर असे त्या तिघांची नावे होती. ते तिघेही मलकापूरचे रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार तिघे भाऊ दुचाकीवर जात होते. अशात समोरून एक ट्रक येत होती. त्यावेळी त्यांना दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे त्यांनी थेट ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी पोहचून तपास सुरु केला आहे.

दरम्यान, साताऱ्यामध्येही भीषण अपघात झाल्याचे समोर आले होते. देवदर्शनासाठी जात असलेले काही भाविक एका ओमनीमध्ये होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने थेट एका झाडाला धडक दिली होती. त्यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.