Buldhana News : पतीच्या मनात पत्नीबद्दल नको तोच संशय, थेट जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, अन्…

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी आरोपीने पत्नीला संपवण्याचा कट बुलढाण्याच्या राजुर घाटात रचला होता. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

आरोपी शेख इब्राहिम शेख चांद यानी संशयातून पत्नीला संपवायचे ठरवले. त्याने दुपारी कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटात आणले. घाटात आल्यानंतर त्याने ओढणीने गळा आवळला.

यावेळी पत्नी ओरडल्याने परिसरात आवाज झाला. जवळच्या पोलीस चौकीत असलेले होमगार्ड सोमनाथ वानरे, शुभम शेळके यांना हा आवाज आल्याने त्यांनी शोध घेतला. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आरोपीवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. अनेकांचे जीव यामध्ये गेले आहेत.

कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तामुळे कालचा प्रसंग रोखला गेला आहे. यामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे.