Buldhana News : भावाला यकृत दान केलं, भावाचा जीवही वाचला पण बहिणीची मनाला चटका लावणारी एक्झिट, घडलं दुःखद..

Buldhana News : सध्या हृदय हेलावून टाकणारी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी थोरल्या भावाला यकृत दान करत भावबीजेची अमूल्य भेट देणाऱ्या बहिणीने जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयात असतानाच त्यांची तब्येत खालावल्याने दुर्दैवी घटना घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंढेरा येथील रमेश नागरे हे पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांना यकृतामध्ये अडचण असल्याचे निदान झाले. यकृताचा काही भाग त्यांना मिळणे आणि त्याचे प्रत्याराोपण होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यांना यकृत घटक कोण देणार याबाबत कुटुंब आणि नातेवाइकांत चर्चा झाली. यानंतर त्यांची बहीण दुर्गाने कोणताही विचार न करता आपल्या थोरल्या भावाला जीवदान देण्याचे ठरविले. त्यांचा रक्तगट जुळत होता. नंतर रुग्णालयात हे यकृताचे प्रत्यारोपण झाले.

नंतर वैद्यकीय काळजी म्हणून दुर्गा यांना डॉक्टरांनी मुंबईत राहण्याचा सल्ला दिला होता. दुर्गा या मुंबईतच होत्या. पहाटे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले मात्र सकाळी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र त्यांचे निधन झाले.

यामुळे सगळ्यांना एकच धक्का बसला. मोठ्या भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या अशा अकाली मृत्यूमुळे जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे कुटूंब दुःखात आहे.

ही शस्त्रक्रिया पार पडली तेव्हा त्यांची तब्येत देखील उत्तम होती. मात्र अचानक ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बहिणीच्या त्यागामुळे भावाचे जीवन दिवाळीत प्रकाशमय झाले, मात्र बहिण यामुळे कायमची निघून गेली.