‘चला हवा येऊ द्या’ शो होणार कायमचा बंद! शो बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर…

सगळीकडे लोकप्रिय ठरलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा मराठी कार्यक्रम नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमाची लोकप्रियता ओसरतानाच कार्यक्रमाच्या टीआरपीनेही तळ गाठला. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे येत्या आठवड्यात शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. या एपिसोडच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. निलेश साबळे यांच्यावर होती. त्यांच्या साथीला कुशल बद्रिके, भाऊ कदम होते. त्यांनी मोठी मेहनत घेऊन याला एक वेगळी ओळख करून दिली.

हा भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अवघ्या १२ तासांत तयार झालेल्या या कार्यक्रमाला पुढे ‘चला हवा येऊ द्या’चे स्वतंत्र रूप देण्यात आले. हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरला होता.

यामध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह सुरू केलेल्या या कार्यक्रमावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीही लोकप्रियता होती.
दरम्यान, अलीकडे हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती.

याबाबत निलेश साबळे म्हणाले की, गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले.

तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता नवे पर्व कधी येणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.