काळ आला पण वेळ नाही, डंपर अंगावर येऊनही वाचले लोक; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

गेल्या काही महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांंमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या अपघाताचे अंगावर काटे आणणारे व्हिडिओही समोर येत असतात. अशात काही लोक या अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचताना दिसतात.

आता मुंबई-नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये हा अपघात घडला आहे.

अपघात भीषण होता, त्यामुळे लोकांचा जीव जाण्याची शक्यता होती. पण काळ आला होता, पण वेळ नाही, असाच काहीसा प्रकार इथे दिसून आला. ही घटना मंगळवारी दुपारी चांदवडच्या उमराने मार्गावर घडली आहे.

या महामार्गावरुन एक चालक त्याचा डंपर भरधाव वेगाने पळवत होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्या डंपरने थेट दुभाजकच तोडले. त्यानंतर तो रस्ता ओलांडून लोकांच्या दिशेने येत होता. त्याठिकाणी काही लोक बसची वाट पाहत होते.

भरधाव वेगात असलेला एक डंपर आपल्याकडे येत असल्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली होती. लोकांना काय करावे हे कळत नव्हते. पण लवकरच ते सतर्क झाल्यामुळे काही प्रवासी त्यातून वाचले. पण दोन प्रवाशांना त्या डंपरने धडक दिली आहे. पण सुदैवाने ते गंभीर जखमी झाले नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालात नेण्यात आले.

प्रवासी एसटीची वाट पाहत होते. पण त्याचवेळी डंपर येत असल्यामुळे काही प्रवासी सतर्क झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. त्यांचं नशीब बलवत्तर असल्यामुळे त्यांना काही झाले नाही. हा सर्व प्रकार एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.