शिक्षकाने विद्यार्थीनीला केलं गर्भवती अन् नंतर दिलं सोडून; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं खुप खास असतं. विद्यार्थी कोणत्या अडचणीत असेल तर शिक्षकच त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो. पण काहीवेळा विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

बहिणीकडे राहण्यासाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणीने कराटे क्लास लावले होते. त्यावेळी शिक्षकाने तरुणीला मॉनिटर करत तिच्याशी जवळीक साधली होती.

तसेच माझी बायको या जगात नाही, मुलबाळ नाही. मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला घरी नेऊन गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी त्या शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटना ही छत्रपती संभाजीनगर येथील आहे. मिलिंद शिवाजी घोरपडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. पीडितेने त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी ही आपल्या बहिणीकडे राहत होती. तिने कराटे शिकायचे म्हणून नोव्हेंबर २०२१ मध्ये मिलिंद घोरपडे यांच्या इथे क्लास लावला होता. काही दिवसानंतर मिलिंद घोरपडेने तिला क्लास मॉनिटर केले होते.

मिलिंदने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. माझी बायको या जगात नाही. मला मुलबाळंही नाही. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असे म्हणत मिलिंदने तिचा विश्वास जिंकला.

त्यानंतर गोड बोलून मिलिंदने तिला घरी नेले. तसेच जबरदस्तीने तिच्याशी संबंध बनवले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले. २०२२ मध्ये ती गर्भवती झाली होती. त्यावेळी आधी नोकरीचे बघू म्हणून त्या मुलाला जन्म देऊ नको असे सांगितले.

मिलिंद तिच्याकडून पैसेही घेत होता. त्याने जवळपास तिच्याकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूकही केली. त्यानंतर तु माझ्या लग्नाची बायको नाही असे म्हणत त्याने तिला हकलून दिले. त्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मिलिंदला अटक केले आहे.