मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! बहिणीनंतर लाडक्या भावांनाही केलं खुश, तरुणांना महिन्याला देणार १० हजार…

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड मिळू शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटनही केले.

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाकाठी १८ हजार रुपये दिले जातील. तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यावर येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकांनी आमच्यावर टीका केली की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, पण लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठीही एक योजना आणत आहोत.

जे तरुण बारावी पास झाले आहेत, त्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला १० हजार रुपये दिले जातील. असे ते म्हणाले. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे पैसे नेमकं कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचा लाभ घेण्यासाठी लवकरच सरकार अटी जाहीर करणार आहे.