गणेश उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मावळमधील सोमाटणे फाटा येथे एका कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत धक्कादायक कारण समोर आले आहे.
माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका, असे म्हटल्याने २१ जणांनी कोयता, लोखंडी सळईने त्यांना बेदम मारहाण केली. यामुळे पोलीस तपास सुरू आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाचा सावटाखाली होते. त्यामुळे मुलाच्या दुःखाचा वेदना त्यांना सहन होत नव्हत्या. असे असताना त्यांच्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक चालली होती.
तेव्हा कुटुंबातील व्यक्तीने मिरवणुकीतील काही व्यक्तींना माझ्या मुलाचे निधन झाले आहे, त्यामुळे माझ्या घरासमोर डीजे वाजवू नका, पुढे जाऊन वाजवा असे सांगितले. यामुळे कार्यकर्त्यांना राग आला.
आरोपींनी डीजे वाजवणे बंद केले. पण मात्र डीजे बंद करायला लावल्याचा राग मनात ठेवून त्यांनी विसर्जन करून परत जाताना आरोपींनी या कुटुंबातील व्यक्तींना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला करुन गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपास करून पोलिसांनी सुनील बंदा रजपूत, मुकेश करसन रजपुत, रवी करसन रजपुत, सनी करसन रजपुत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच प्रवीण करसन रजपुत, अक्षय ज्ञानेश्वर काकडे, अतुल वेलसी रजपुत, कृष्णा बलभीम खराते, रवी हिरा रजपुत, संदीप रमेश रजपुत, विशाल काळुराम रजपूत, संतोष काळुराम रजपूत यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.