मुलांची झोपायची तयारी, पण गादी उचलताच सगळे हादरले, भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सध्या वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

याठिकाणी आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या मुलाचा मृतदेह सापडला. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांची असल्याची समजते. यामुळे पोलीस आता याबाबत तपास करत आहेत.

दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता तो दिसला होता. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी झोपण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना मोठा धक्काच बसला.

मुलं नेहमीच्या जागेवरुन गाद्या काढत होती. तेव्हा एका गादीखाली शिवमचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी इतर उपस्थित मुलांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेता.

याबाबत मुलांच्या इतर जवळच्या लोकांना कळवण्यात आले आहे. दरम्यान, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामधून शिवमच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याबाबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत माहिती घेतली.

दरम्यान, या घटनेबाबत तर्कवितर्क चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सध्या पोलीस येथील विद्यार्थ्यांची चौकशी करत आहेत.