देशात चाललंय काय? UPSC नापास होऊनही ती दोन वर्षे IFS म्हणून वावरली, तपासात वेगळंच आलं समोर..

सध्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनेकांच्या सेवेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता एक तरुणी युपीएससी परीक्षा पास न होताच दोन वर्षांपासून आयएफएस म्हणून वावरत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार सोहळे स्वीकारत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील पोलीस उपनिरिक्षकाच्या मुलीने युपीएससीची परीक्षा पास झाल्याचा दावा केला होता. आपण आयएफएस झाल्याचे सांगून ही तरुणीने गेल्या दोन वर्षांपासून उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार स्वीकारत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी या तरुणीने आपण युपीएससी पास केली असून, स्पेनच्या मॅद्रीद शहरातील भारतीय दूतावासात आपली नियुक्ती झाल्याचा दावा केला होता. ज्योती मिश्राच्या सोशल मीडियावरील सत्कार सोहळ्याच्या पोस्ट पाहूण एका युजरने 2021 चा युपीएससीचा निकाल शोधला.

त्यानंतर युजरला लक्षात आले की, निकालात नाव असलेली ज्योती आणि IAF म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या आहे. या युजरच्या दाव्यानंतर ज्योतीने आपली बदनामी केली जात असल्याचा दावा केला. पण यानंतर आणखी काही सोशल मीडिया युजरने स्पेनमधील भारतीय दूतावासाला ईमेल करत ज्योती नावाच्या अधिकाऱ्याबाबत चौकशी केली.

यानंतर या ईमेल्सना उत्तर देताना भारतीय दूतावासाने सांगितले की, आमच्याकडे ज्योती नावाची कोणतीही अधिकारी नाही. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. रायबरेलीची असलेल्या ज्योती मिश्राने २०२१ ची युपीएससी परीक्षा दिली होती. मात्र, यात ती पास झाली नाही. दरम्यान त्यावेळी ज्योतीच्या मैत्रिणी पास झाल्याने हे अपयश तिला सहन झाले नाही.

त्यावेळी युपीएससीच्या निकालात ज्योती नावाच्या दुसऱ्या मुलीचे नाव होते, पण निकालात आलेले नाव आपलेच असल्याचे सांगत आपण IFS अधिकारी म्हणून स्पेनमध्ये रूजू झाल्याचे ज्योतीने सर्वांना सांगितले होते. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यासह देशभरात सध्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण गाजत आहे.

पूजाचे कारनामे समोर आल्यानंतर देशभरातून अशी अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. ज्यामध्ये युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी उमेदवार गैरप्रकार करत आहेत. यामुळे आता या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.