Couple sex : जोडप्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा होतेय कमी, धक्कादायक कारणं आली समोर, जाणून घ्या…

Couple sex : गेल्या काही दिवसांपासून जोडप्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. याचा महिलांवरही परिणाम होऊ शकतो. या समस्येची अनेक कारणं आहेत आणि ही गंभीर समस्या आहे असं ही काही नाही.

यामध्ये तणाव, गर्भधारणा, बाळंतपण, स्तनपान यांसारख्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये आयुष्यात होणाऱ्या सामान्य घडामोडी देखील जबाबदार असतात. यामुळे याला वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत.

यामध्ये ताणतणाव, थकवा, रोजच्या आयुष्यात झालेला बदल, सेक्स करण्यासाठीचा वेळ इतरत्र घालवणं, यामुळे कामवासना कमी होऊ शकते. तसेच एकाच व्यक्तीशी सेक्स केल्यामुळे इच्छा कमी होणे. तसेच मानसिक आजारांमुळे सेक्सच्या इच्छेवर परिणाम होतो.

काही अँटी-डिप्रेसंट्स आणि अँटी-अँझाईटी औषधांचा देखील सेक्सवर परिणाम होतो. नैराश्यावर उपचार न केल्यास कामवासनेवर परिणाम होऊ शकतो. आणि औषध अर्धवट सोडल्यानेही कामवासनेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्ही आनंदी असू शकत नाही.

दरम्यान, यासाठी रुग्णाने लैंगिक संबंधाशी संबंधित कोणत्याही समस्यांबद्दल डॉक्टरांशी उघडपणे चर्चा केली पाहिजे. नाहीतर पुढे सेक्सची पूर्ण इच्छा कमी कमी होत जाते. तसेच स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेन हा हार्मोन आणि पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन त्यांची कामवासना नियंत्रित करतो.

योनीतून स्नेहन येण्यासाठी इस्ट्रोजेनशी संबंधित पेनिल पेशी कारणीभूत असतात. स्तनपान, लठ्ठपणा यासारखी इतर कारणं देखील डॉक्टर तपासतात ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात.

दरम्यान, रुग्णाला इतर काही आजार असतील तर व्यक्तीच्या सेक्सवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतात. तसेच यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघांमधील संवाद देखील महत्वाचा असतो.

जोडप्याला सेक्स करायचा असेल तर त्यांच्यातील संवाद महत्वाचा आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. तसेच एकमेकांची इच्छा असेल तरच सेक्स करावा नाहीतर सेक्सचा आनंद घेता येत नाही. मुलं हवं असेल तर तसा संवाद देखील दोघांमध्ये असावा.