Crime news : मिरारोड हत्याकांडाचा केमिकल रिपोर्ट आला, सरस्वतीच्या शरीराचे तुकडे शिजवल्याने…

Crime news : मिरारोडच्या सरस्वती वैद्य निर्घृण हत्या प्रकरणाला सध्या वेगळे वळण लागले आहे. आता रासायनिक पृथक्करण अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सरस्वतीने कीटकनाशक प्राशन केले होते की नाही हे कळू शकलेले नाही.

याबाबत माहिती अशी की, मृतदेह शिजवण्यात आल्याने व इतर कारणास्तव चाचणीत स्पष्ट काहीच कळू शकलेले नाही. त्यामुळे आरोपीच्या दाव्यानुसार सरस्वतीने स्वतःहून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, हे समजले नाही.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्य यांची ५६ वर्षीय मनोज साने याने हत्या केली. इमारतीमध्ये दुर्गंध पसरल्यानंतर हे प्रकरण उघडे झाले. आरोपी मनोजने मृतदेहाचे धारदार शस्त्राने अनेक तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले.

तसेच ते घरालगत विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने फेकून दिले होते. नंतर मात्र सरस्वतीने स्वतः कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली, असल्याचे सांगितले जाऊ लागले. यामध्ये मला जबाबदार धरले जाऊ नये, यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे त्याने म्हटले.

तसेच घटनेनंतर त्यांच्या घरात एक कीटकनाशकाची बाटली सापडली होती. मात्र मनोज दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना होता. यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहाचे काही नमुने मुंबईतील कलिना येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

याबाबत अहवाल पोलिसांना मिळाला आहे. मृतदेह कुकरमध्ये शिजवण्यात आल्याने व तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यात कीटकनाशक प्राशन केल्याचे नमुने आहेत किंवा नाहीत हे काहीच स्पष्टपणे कळले नाही. यामुळे हे गूढ कायम आहे.