Crime News : कल्याणमधील एका उद्योजकाने आपली पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला तोंडावर उशी दाबून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर उद्योजक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर याबाबत त्याने आपल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याविषयी कळवले. दीपक गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे. तसेच त्याने मी देखील आत्महत्या करणार असल्याचे कर्मचाऱ्याला सांगितले होते. पत्नी आणि मुलाला ठार मारल्यानंतर दीपक कुठे निघून गेला, हे पोलिसांना अजून समजले नाही.
दीपकने नैराश्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. दीपक हा त्याची पत्नी अश्विनी गायकवाड (वय ३५), मुलगा अधिराज (वय ७) यांच्यासह रामबाग परिसरातील राहत होता.
दरम्यान, दीपक हा उद्योजक होता. तो निधी रिसर्च फायनान्स या कंपनीचा मालक होता. या कंपनीत अनेक कर्मचारी कामाला आहेत. कल्याणमध्ये दीपकच्या मालकीची काही दुकाने आणि एक नर्सरी शाळा होती.
दरम्यान, दीपक गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी निधी रिसर्च फायनान्स ही कंपनी सुरु केली होती. सुरुवातीला ही कंपनी चांगली चालत होती. नंतर मात्र त्यांना नुकसान सोसावे लागले.
त्यामुळे दीपक प्रचंड निराश झाला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेनंतर दीपकने त्याच्या कंपनीतील आकाश सुरवडे या कर्मचाऱ्याला फोन केला होता. दीपकने त्याला सांगितले की, मी माझ्या पत्नी आणि मुलाला ठार मारले आहे. यामुळे त्याने घरी येऊन याबाबत तपास केला.








