Crime News: हॉटेलच्या रूममध्ये पोटच्या पोराचा खून करून ती पळत होती, पण ‘या’ चुकीनं बिंग फुटलं

Crime News: जन्मदात्या आईने स्वत:च्या पोसच्या मुलाचा खून केला आहे. ही घटना गोव्यातील एका हाॅटेलवर घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जग हदरले आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. खून केलेल्या महिला आरोपीच नाव सूचना सेठ आहे. पण या महिलेने खून का केला?याच तपास पोलिस करत आहेत. यामध्ये एकवर एक खुलासे होत आहेत.

सूचना सेठ कोण?
सूचना सेठ मूळची पश्चिम बंगालमधील आहे. तिचे लग्न 2010 साली केरळमधील एका तरुणाशी झाले. 2019 साली त्यांना एक मुलगा झाला. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनात लवकरच वाद सुरू झाले. 2020 साली त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान मुलाची कस्टडी कोणाकडे असावी हा महत्त्वाचा मुद्दा होता. न्यायालयाने तात्पुरता तोडगा म्हणून मुलाचा ताबा दर रविवारी वडिलांकडे देण्याचा आदेश दिला होता. 10 जानेवारी रोजी या विषयावर बेंगलुरूतल्या कौटुंबिक न्यायालयात अंतिम निर्णय होणार होता. त्या आगोदरच हा सर्व प्रकार घडला आहे.

सूचनाला कसं पकडलं?
सूचनाने मुलाची खून करून त्याचा मृतदेह बॅगेत भरून नेला होता. त्यावेळी ती बंगळुरुला कारने गेली. पण यावेळी हॉटेलमधून बाहेर पडताना तिच्यासोबक तिचा मुलगा नव्हता. हे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आलं. तर काही वेळात एका हाउस किपिंग स्टाफला खोलीत रक्ताचे थेंब आढळले. हा महिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी यावर तात्काळ तपास सुरू केला. यावेळी खोलीत पडलेले रक्ताचे डाग मुलाला संपवल्यानंतर तिने हाताची नस कापण्याचा प्रयत्न करतानाचे असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सूचनाची भूमिका काय?
या प्रकरणी पोलिसांनी सूचनाला माहिती विचारली. त्यानेळी तिने सांगितले की, काय झाले त्याची मला कसलीही कल्पना नाही. मी सकाळी उठले तेव्हा मला मुलगा गतप्राण झालेल्या अवस्थेत दिसला. त्याचवेळी पोलिसांनी खोलीतील रक्ताच्या डागांविषयी विचारले. त्यावर ती म्हणाली की, माझी मानसीक पाळी सुरू आहे. त्यामुळे ते पडले असावेत. तसेच ती म्हणते की, जोपर्यंत माझे वकिल येत नाहीत. तोपर्यंत मी एक शब्दही बोलणार नाही.

पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
पोस्टमॉर्टम अहवालानुसार, मुलाचा गुदमरून झाला असल्याचे समोर आले आहे. त्याचा चेहरा आणि छाती सुजलेली होती आणि नाकातून रक्त होत होता.

ही घटना घडली तेव्हा सूचनाचे पती व्यंकट रमण इंडोनेशियामध्ये होते. ते तातडीन कर्नाटकात परतले. त्यानंतर मृतदेहाचा ताबा मिळाल्यावर ते ऍम्बुलन्समधून अंतिमसंस्कारासाठी बेंगळुरुला रवाना झाले आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील वैमनस्याच्या कारणाने खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. व्यंकट रमण यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.